उदयनराजेंचं अखेर ठरलं, घेतला ‘हा’ अंतिम निर्णय?

उदयनराजेंचं अखेर ठरलं, घेतला ‘हा’ अंतिम निर्णय?

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. याबाबत अखेर उदयनराजे यांनी अंतिम निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. भाजप नेतृत्वाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्यास विलंब होत असल्यामुळे त्यांनी भाजप प्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे उदयनराजे आता राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान लोकसभेच्या निकालानंतर साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्या. याबाबत उदयनराजेंनी देखील भाजपात जाण्याचे संकेत दिले होते. परंतु आज अखेर त्यांनी राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

COMMENTS