स्टाईल इज स्टाईल, ती कायम राहणार, उदयनराजेंचं शिवसेनेला प्रत्युत्तर!

स्टाईल इज स्टाईल, ती कायम राहणार, उदयनराजेंचं शिवसेनेला प्रत्युत्तर!

सातारा – सामनामधील अग्रलेखावर उदयनराजे यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे. मी कधीच बेशिस्त नाही, प्रत्येकाचा वेगळा विचार असतो. प्रत्येकाला विचार मांडण्याचा हक्क आहे. कॉलर उडवणे बेशिस्त आहे का? असा सवाल करत उदयनराजे यांनी माझी स्टाईल वेगळी आहे. स्टाईल इज स्टाईल, ती कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच पवारांचा आज, काल आणि उद्याही आदर करतो. सातारा जिल्हा संपुष्टात आणण्याचा डाव होता. एक बारामती आणि दुसरा कराड असे जिल्हे बनवण्याचा डाव मी हाणून पाडला असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी कुठलीच काम करण्याचा प्रयत्न केला नसल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजेंची शिवसेनेनं कानउघडणी केली आहे. शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत. शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा होता. शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा असल्याचं सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शाह व्यासपीठावर असताना शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाही. याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. येथे हायकमांड आहे आणि ते दिल्लीत आहे अशी समज या अग्रलेखातून उदयनराजेंना देण्यात आली आहे.

यावर उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मी कधीच बेशिस्त नाही, प्रत्येकाचा वेगळा विचार असतो. प्रत्येकाला विचार मांडण्याचा हक्क आहे. कॉलर उडवणे बेशिस्त आहे का? असा सवाल करत उदयनराजे यांनी माझी स्टाईल वेगळी आहे. स्टाईल इज स्टाईल, ती कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS