शिवेंद्रराजेंच्या खांद्यावर उदयनराजेंनी ठेवला हात, अजून मी फीट आहे, कधीही प्रात्यक्षिकासाठी तयार! VIDEO

शिवेंद्रराजेंच्या खांद्यावर उदयनराजेंनी ठेवला हात, अजून मी फीट आहे, कधीही प्रात्यक्षिकासाठी तयार! VIDEO

सातारा- साता-याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यात सध्या सुरू असलेला वाद उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मात्र आज कुडाळ येथील एका मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी दोन्ही राजे एकत्र आले. एकत्र आल्यानंतर दोघांनीही एकमेकांना हसतमुखाने हस्तांदोलन करीत शाब्दिक चिमटे काढले. खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचा खांदा दाबला असता शिवेंद्रराजे यांनीही मोठया मनाने त्यांना दाद देत माझा सारखा खांदा का दाबताय असे म्हणाले, त्यावर दिलखुलासपणे उदयनराजे भोसले यांनी फिटनेस बघत आहे असा टोला मारला, तर शिवेंद्रराजे यांनीही चाणाक्षपणे माझा फिटनेस कायमच फीट असून कधीही प्रार्त्यक्षिक दाखवायची तयारी आसल्याचा टोला लगावला. त्यानंतर दोघेही हसत हसत मार्गस्थ झाले.

COMMENTS