उद्धव ठाकरे आज गोव्याच्या दौ-यावर

उद्धव ठाकरे आज गोव्याच्या दौ-यावर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गोव्याच्या दौ-यावर जाणार आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते आणि गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष सुभाष वेलींगकर यांच्या कन्येचा विवाह सोहळा पणजी येथे आज पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याला आज  दुपारी 12 च्या सुमारास ते उपस्थित राहणार आहेत.

या लग्नसोहळ्यासाठी आरएसएस आणि भाजपचे अनेक केंद्रीय नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे केंद्रीय राजकारण आणि गुजरात निवडणुकांच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे-आरएसएस -भाजप असा संवाद कदाचित होऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या दौ-याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS