आजपासून आंगणेवाडीची जत्रा, उद्धव ठाकरेंचं देवीला साकडं !

आजपासून आंगणेवाडीची जत्रा, उद्धव ठाकरेंचं देवीला साकडं !

सिंधुदुर्ग – आजपासून आंगणेवाडीची जत्रा सुरु झाली आहे. या जत्रेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंगणेवाडीत गेले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभेवर भगवा फडकू दे असं असं साकडं आंगणेवाडी इथल्या भराडी देवीला घातलं आहे. तसेच त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आंगणेवाडीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटनही करण्यात आलं आहे.

यावेळी त्यांनी भाजपला टोला हाणला असून सगळे प्रकल्प गुजरातला हलवले जात आहेत तसेच कोकणतले वादग्रस्त प्रकल्प गुजरातला घेऊन जा, कोकणवासियांना तुमच्या असल्या उपकाराची गरज नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आज पहाटे चार वाजल्यापासून देवीच्या दर्शनाला सुरुवात झाली असून यावर्षी सुमारे आठ लाख भाविक दर्शनाला हजेरी लावणार असल्याची शक्यता देवस्थान मंडळाने व्यक्त केली आहे.

COMMENTS