…तर आमच्यात आणि आघाडीत काय फरक राहिला? – उद्धव ठाकरे

…तर आमच्यात आणि आघाडीत काय फरक राहिला? – उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
शिवसेनेचा जन्मच शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच झाला आहे. सत्तेमध्ये असून शिवसेना विरोधकांसारखी वागते अशी टीका आमच्यावर केली जाते. आम्ही सत्तेमध्ये जरूर मात्र आम्ही सामन्य माणसाचा आवाज म्हणून शिवसेनेत आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. गरज पडल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाईन असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे

दरम्यान आम्ही शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आमच्यात आणि आघाडीमध्ये फरक काय राहिला? शेतकऱ्यांना नडाल तर तुमची दुकानं बंद करून टाकू असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला आहे. दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजला आहे. अनेक योजना इथल्या लोकांपर्यंत पोहचत नाही. शेतकरी जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे काम कायमच शिवसेनेने केले असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

COMMENTS