दिवाळीला नाही तर मी दररोज फटाके वाजवतो – उद्धव ठाकरे

दिवाळीला नाही तर मी दररोज फटाके वाजवतो – उद्धव ठाकरे

नाशिक – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज नाशिकच्या दौ-यावर आहेत. निफाडमध्ये विविध कामांच्या भूमिपुजनासाठी ते गेले आहेत. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. या कार्यक्रमादरम्यान बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच दिवाळीच्या आणि नविनवर्षाच्या शुभेच्छा जनतेला दिल्या. यावेळी त्यांनी दिवाळीला मी फटाके वाजवत नाही मी दररोज फटाके वाजवतो असा टोला लगावला आहे.

दरम्यान कर्जमाफी केली मात्र अजूनही शेतकरी मला भेटतात कर्जमाफी झालेली नाही. शेतकरी मोर्चादरम्यान मुंबईच्या वेशीवर शेतकऱ्यांचं स्वागत केलं, कम्युनिस्ट लोकांचा लाल रंगाचा झेंडा दिसला नाही मात्र त्यांच्या अनवाणी पायातून आलेला लाल रंग दिसला असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच मी सरकारवर टीका करत नाही मी जनतेच्या बाजूने आहे. सर्व प्रश्न सोडवता येणार नाहीत जे जे शक्य होईल ते प्रश्न सोडवीणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

हायब्रीड पद्धतीचा पहिला रस्ता महाराष्ट्रातील नाशिकमध्ये आहे. गोळ्या देत नाही पाकिस्तान मध्ये जाऊन द्या. मी घरातील चुली पेटवण्यात लक्ष देतो कुणाचं घरी पेटवण्यात देत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे.

COMMENTS