या भागात अनेक वाघ, पण ते फोटोच्या स्वरुपात टिपण्यासाठी मुख्यमंत्री फोटोग्राफर आहेत, शरद पवारांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले…

या भागात अनेक वाघ, पण ते फोटोच्या स्वरुपात टिपण्यासाठी मुख्यमंत्री फोटोग्राफर आहेत, शरद पवारांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले…

जळगाव – जळगावातील मुक्ताईनगरात झालेल्या शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज हजेरी लावली. यावेळी शरद पवारांनी या भागात अनेक वाघ आहेत असं मला सांगितलं. पण ते वाघ फोटोच्या स्वरुपात टिपण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोटोग्राफर असल्याचं शरद पवार म्हणाले.त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत “तुम्ही माझ्या फोटोग्राफीचा उल्लेख केला. लहानपणापासून मी वाघात वाढलोय. माझ्या अवतीभोवती ‘वाघ’ होते. पण मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हुशार वाघ निघाले. हा वाघ तुमच्यासाठी धडपडतोय असं ते म्हणाले.

दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ खडसेंचं नाव न घेता टोला लगावला. मुक्ताईनगर मुक्त झाले, कोणापासून मुक्त झाले?” असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुक्ताईनगरात जाऊन भाजप नेते एकनाथ खडसेंवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला. तसेच काँग्रेस – राष्ट्रवादी आणि शिवसेना वेगवेगळे विचाराचे पक्ष एकत्र आले. पंचवीस-तीस वर्ष आम्ही सोबत लढलो, त्यांनी विश्वास ठेवला नाही. मात्र ज्यांच्या विरोधात 35  वर्ष संघर्ष केला त्यांनी लगेच माझ्यावर विश्वास ठेवला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.

COMMENTS