सर्व महापालिकांमधील 700 चौरस फूटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करा – उद्धव ठाकरे

सर्व महापालिकांमधील 700 चौरस फूटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करा – उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यातील सर्व महापालिकांमधील 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांचाही मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतल्या 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वच महानगर पालिकेतील 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी करण्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या मागणीमुळे भाजपच्या अडचणीत आता मोठी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेनं आपल्या वचननाम्यात 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु आता थेट मुख्यमंत्र्यांनी 700 फुटांच्या घरांवर मालमत्ता कर माफीची घोषणा केल्यानं भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरु झाली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता शिवसेनेनं सर्वच महापालिकेतील घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी केली आहे.

COMMENTS