नारायण राणेंच्या पायगुणामुळं काँग्रेस संपली, ते जातील तिथं अपशकुन करतील – उद्धव ठाकरे

नारायण राणेंच्या पायगुणामुळं काँग्रेस संपली, ते जातील तिथं अपशकुन करतील – उद्धव ठाकरे

सावंतवाडी – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर जोरदीर टीका केली आहे. नारायण राणे अपशकुनी आहेत. ते जातील तिथं अपशकुन करतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंना लाथ मारून पक्षा बाहेर हकललं होतं. त्यांनतर ते काँग्रेसमध्ये गेले. त्यांच्या पायगुणामुळं काँग्रेस संपली. त्यानंतर ते भाजपत गेले. तिथेही ते काहीतरी अपशकुन करतील. त्यामुळे भाजपनं वेळीच आपली चूक सुधारून त्यांना पक्षातून हाकलून द्यावं,असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ते दीपक केसरकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

दरम्यान मित्राच्या घरात चोर घुसत असताना शांत बसणे शक्य नाही. मी येथे टीका करण्यासाठी आलो नाही तर भाजपला सावध करण्यासाठी आलो आहे. राज्यात पुन्हा एकदा युतीचंच सरकार येणार आहे. या सरकारमध्ये तंगडीत तंगडी घालणाऱ्यांना स्थान नाही.त्यामुळे कोणताही गुन्हा नसणाऱ्या, स्वच्छ प्रतिमेच्या दीपक केसरकरांना पुन्हा विधानसभेत पाठवा, असं आवाहनही यावेळी ठाकरे यांनी केलं आहे.

कणकवली मतदारसंघात भाजप आणि शिवसेना हे युतीतील दोन्ही मित्रपक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. भाजपने नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांना तर शिवसेनेने राणेंची साथ सोडून काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतजारसंघातील निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS