नाराज शिवसैनिक म्हणतायत, राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाहीत ?

नाराज शिवसैनिक म्हणतायत, राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाहीत ?

मुंबई – स्वपक्षातील कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षामध्ये स्थान दिलं जात असल्यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी आपल्या नाराजगीचा बॅनर लावला आहे. हा बॅनर घाटकोपरमधील विभाग क्रमांक 8 मधील आहे. यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत स्थान देण्यात आलं आहे. तसेच  ‘शिवसेनेला निष्ठावंतांची गरज नाही, चार घरं फिरुन आलेल्या लोकांची पक्षाला गरज आहे, असं म्हणत शिवसैनिक आक्रमक झाले.त्यामुळे शिवसैनिकांनी पदाधिका-यांना थेट सवाल करत राज ठाकरेंना पक्षात का घेत नाहीत असं म्हटलं आहे. शिवसैनिकांच्या या बॅनरमुळे येथील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला असल्याचं दिसून येत आहे.

बॅनरवरील मजकूर

ईशान्य मुंबई विभाग प्रमुख मा. श्री. राजेंद्र राऊत साहेब यांच्या धोरणानुसार ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची उपविभाग प्रमुख, विधानसभा संघटक, सहसंघटक व शाखाप्रमुख यांची यादी नुकतीच जाहीर झाली. त्याचवेळी लक्षात आले की, यातील नियुक्त्या करण्यात आलेले बरेच जण अनेक पक्ष फिरुन संघटनेच्या विरोधात निवडणूक लढवून किंवा विरोधात काम करणाऱ्यांना मा. विभाग प्रमुखांनी संघटनेची सन्मानाची पदे बहाल केली आहेत. याचा अर्थ असा होतो की सध्या शिवसेनेत या पदांच्या लायकीचा निष्ठावंत शिवसैनिक या पदाच्या लायकीचे नाही. त्यामुळे मा. राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून आलेल्या लोकांना महत्त्वाचे पदे बहाल करण्यात आली. त्या ऐवजी मा. राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही?

 

COMMENTS