युनाईटेड रिपब्लिकन पार्टीचाा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बिनशर्त पाठिंबा !

युनाईटेड रिपब्लिकन पार्टीचाा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बिनशर्त पाठिंबा !

मुंबई – युनाईटेड रिपब्लिकन पार्टीचा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. युनाईटेड रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तानसेन नन्नावरे, अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सायंकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची भेट घेतली. लोकशाही व संविधान विरोधी जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी आपण काँग्रेस आघाडीला समर्थन देत असल्याचे युनाईटेड रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांनी यावेळी जाहीर केले.

या शिष्टमंडळात नितीन मोरे, आनंदराव निरभवणे, बाळासाहेब निर्मळे, प्रशांत नांदगावकर, उत्तमराव गायकवाड, अॅड. सादिक शिलेदार, उत्तमराव नवघरे, एम.एच. मन्सुरी, राजेंद्र साठे, महावीर वजाळे, ईश्वरसिंग झंझोटड, भाऊसाहेब पगारे, किशोर तरवडे आदी उपस्थित होते.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी युनाईटेड रिपब्लिकन पार्टीचे आभार मानून विरोधी पक्षांच्या महाआघाडीत त्यांचे स्वागत केले.

COMMENTS