उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव !

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव !

उत्तर प्रदेश – गोरखपूर आणि फुलपूरमध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. फुलपूरमध्ये समाजवादी पार्टीचे उमेदवार नागेंद्रसिंग पटेल यांचा 59 हजार 613 मतांनी विजय झाला आहे. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जाणा-या गोरखपूरमध्येही भाजपला पराभवाची धूळ चारण्यात आली आहे. याठिकाणी भाजपचे उपेंद्र दत्त शुक्ला यांचा पराभव झाला असून सपाच्या प्रवीणकुमार निषाद यांचा जवळपास 21 हजार मतांच्या फरकाने विजय झाला आहे. या मतदारसंघात योगी आदित्यनाथ 1998 पासून सलग 5 वेळा निवडूण आले आहेत. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ते मोठ्या फरकाने जिंकले होते. त्यावेळी 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते भाजपला मिळाली होती. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यनंतर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यामुळे तिथे निवडणूक घेण्यात आली. इथ पराभव झाल्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

दरम्यान बिहारमध्ये अररिया मतदारसंघात लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे उमेदावराचा 61 हजार 988 मतांनी विजय झाला आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी भाजपच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. मात्र तरीही भाजपचा उमेदवराचा पराभव झाला आहे. अररिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाचा उमेदवार निवडूण आला तर अररिया मतदारसंघ हा पाकिस्तानातील आयएसआयचा गड होईल असं वक्तव्य भाजपच्या बिहार प्रदेशाध्यक्षांनी केलं होतं. तसंच लालू प्रसाद यादव हे तरुंगात गेले असतानाही तिथून आरजेडीचा उमेदवार जिंकला असल्यामुळे आरजेडीचं कौतुक केलं जात आहे. तसेच बिहारमध्ये आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला असल्याचं पहावयास मिळालं आहे. दरम्यान या निवडणुकीतील अपयशामुळे भाजपमध्ये नाराजी पसरली असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS