उत्तर प्रदेशात भाजपला धक्का, या उमेदवाराची उमेदवारी अडचणीत !

उत्तर प्रदेशात भाजपला धक्का, या उमेदवाराची उमेदवारी अडचणीत !

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत भाजपला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. गोरखपूरमधून भाजपच्या तिकीटावर लढणारे अभिनेते रवी किशन यांची उमेदवारी अडचणीत सापडली आहे.या निवडणुकीत गोरखपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करताना रवी किशन यांनी आपण बारावी उत्तीर्ण असल्याचं सांगितलं आहे. पण याच रवी किशन यांनी 2014 च्या निवडणूक शपथपत्रात ते पदवीधर असल्याचं नमूद केलं होतं. त्यामुळे रवी किशन आता अडचणीत आले आहेत.

दरम्यान अभिनेता रवी किशन उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. भाजपनं जाहीर केलेल्या 21व्या यादीत याची अधिकृत घोषणा करण्यात आली. 2014मध्ये रवी किशन यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत रवी किशन यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जौनपूरमधून निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली होती. आता रवी किशन यांच्या शपथपत्रातील या तफावतीवरून आता विरोधकांकडून त्यांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS