विधानपरिषद उपसभापती निवडणुकीची रंगत वाढली, भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार जाहीर,  कोणाचं किती संख्याबळ? वाचा सविस्तर

विधानपरिषद उपसभापती निवडणुकीची रंगत वाढली, भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार जाहीर, कोणाचं किती संख्याबळ? वाचा सविस्तर

मुंबई – विधानपरिषद उपसभापती निवडणुक उद्या होणार आहे. या निवडणुकीसाठी रंगत वाढली असून भाजपने भाई गिरकर यांना उमेदवारी दिली आहे. भाई गिरकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.या निवडणुकीत दुसरे उमेदवार शिक्षक आमदार कपिल पाटील यांना भाजप पाठिंबा देणार असल्याचीही चर्चा होती, पण भाजपने स्वत:चाच उमेदवार रिंगणात उतरवला आहे.

तर दुसरीकडे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानपरिषदेतील पक्षनिहाय संख्याबळानुसार शिवसेना १४, राष्ट्रवादी काँग्रेस ९ तर काँग्रेसचे ८ सदस्य आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांचं संख्याबळ ३१ आहे. तर
भाजप २२, शेकाप १, रासप १,
लोकभारती १ , अपक्ष ४ अशी संख्या आहे. भाजपचे आणि इतर पक्षांचे मिळून संख्याबळ २९ होत आहे. त्यामुळे या निवडणूकीत मतविभागणी करत उपसभापती विजयासाठी भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजप काय खेळी करणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS