विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार ?

विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार ?

मुंबई -दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवर उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आज दुपारी 3 वाजता संपली. या जागेसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे उद्या या अर्जाची छाननी करून उमेदवारी पात्र ठरल्यास 27 सप्टेंबरला अरुण अडसड यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे.

दरम्यान पांडूरंग फुंडकर यांची २०१४ साली विधान परिषदेवर निवड झाली होती. विधानसभेच्या आमदारांद्वारे विधान परिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या आमदारांच्या कोटय़ातील ही जागा असून भाजपचा झेंडा पश्चिम विदर्भात फडकवीत ठेवणारे नेते म्हणून अडसड यांचे पक्षात स्थान आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका ते लढले.  ते दोनदा चांदूर (रेल्वे) मतदारसंघातून विजयी झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याऐवजी दुसरा चेहरा देण्याचा व अडसडांना अन्य जबाबदारीत सामावून घेण्याचा प्रस्ताव अडसडांनी नाकारला होता. पण मोदी लाटेत व खुद्द मोदींची सभा चांदूरात होऊनही त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

 

 

COMMENTS