विधानभवनच्या कॅन्टीनमध्ये मटकीच्या उसळीत आढळले चिकनचे तुकडे !

विधानभवनच्या कॅन्टीनमध्ये मटकीच्या उसळीत आढळले चिकनचे तुकडे !

मुंबई – विधानभवनच्या कॅन्टीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे यांना हे चिकनचे तुकडे आढळले असून त्यांनी विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. संबंधित कंत्राटदार निष्काळजीपणे कॅन्टीन चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या कंत्राटदारांवर सचिवांनी योग्य ती कारवाई करण्याची मागणी मनोज लाखे यांनी केली आहे.

या कॅन्टीनमध्ये आधिकारी,नेते,पत्रकार, तसेच विधानभवनात येणारे अभ्यागत नियमित जेवण करत असतात. या घटनेमुळे कॅन्टीनमधील जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे या कंत्राटदारावर काय कारवाई केली जाणार हे पाहणे गरजेचं आहे.

COMMENTS