इतिहासात पहिल्यांदाच विधीमंडळाबाहेर होणार पावसाळी अधिवेशन!

इतिहासात पहिल्यांदाच विधीमंडळाबाहेर होणार पावसाळी अधिवेशन!

मुंबई – इतिहासात पहिल्यांदाच विधीमंडळाबाहेर पावसाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावात विधान परिषदेचे कामकाज विधानभवनात शारीरिक अंतर राखून करता येऊ शकेल. तर विधानसभेचे कामकाज मात्र सभागृहाच्या बाहेर वॉटरप्रूफ वातानुकूलित मंडप उभारुन त्या ठिकाणी घ्यावे, असं म्हटलं आहे.
या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक 7 ऑगस्टला होणार आहे. त्यात अधिवेशनाच्या आयोजनाची रुपरेषा निश्चित केली जाणार आहे. त्यात मोकळ्या जागेत अधिवेशन आयोजित करण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होणार आहे. विधानभवनाबाहेर भरलेलं हे इतिहासातील पहिलेच अधिवेशन ठरणार आहे.

दरम्यान या प्रस्तावामुळे विधीमंडळाचे सात सप्टेंबरपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन विधानभवनाबाहेर होण्याची शक्यता आहे. विधीमंडळाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत मंडप उभारुन अधिवेशन घेतले जाण्याची चिन्हं आहेत. विधीमंडळाच्या पार्किंगच्या जागेचाही अधिवेशन स्थळासाठी विचार होत आहे. त्यामुळे वाहन पार्किंगचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यासाठी आजूबाजूच्या काही खासगी व शासकीय इमारतींमधील पार्किंगची जागा तात्पुरत्या स्वरुपात घेण्याचा विचार केला जात आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सभागृहाबाहेर अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला आहे.

COMMENTS