लोक चिडले तर ईडीला बीडी सारखे फुकतील – वडेट्टीवार

लोक चिडले तर ईडीला बीडी सारखे फुकतील – वडेट्टीवार

अहमदनगर – भाजप जे पेरत आहे, ते आगामी काळात उगवणार, हे ही लक्षात घ्यावे. केंद्रीय एजन्सीचा दुरुपयोग कोणाच्या मागे लावण्यासाठी केला जात असेल तर हे योग्य नाही. ही प्रथा भविष्यात सर्वांना अडचणीची आहे. उद्या महाराष्ट्रातील लोक चिडले तर ईडीला बीडी सारखे फुकतील,’ असा टोला मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला. अहमदनगर येथे ओबीसी जिल्हा मेळाव्यासाठी मंत्री विजय वडेट्टीवार नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

वडेट्टीवार म्हणाले, आता राजकारणात बदला घेण्याची भावना वाढली आहे. पूर्वी मतभेद होते, पण मनभेद नव्हते. आता मात्र राजकारणात मनभेद वाढले आहेत . ही प्रवृत्ती वाढत असून हे लोकशाहीला पोषक नाही. सत्ता कोणाच्या बापाच्या मालकीची नसते. हे भाजपने लक्षात ठेवावे.

आम्ही अनेक राज्यात निवडणूक जिंकलो. पण भाजपच्या कुटील, फोडाफोडीच्या राजकारणामुळे आमच्या हातातून अनेक राज्य गेली आहेत. देशाच्या राजकारणात असे कधी झाले नाही, की माणसे फोडून सरकार बनवले गेले. मात्र भाजपने पैशाच्या जोरावर, सत्तेच्या मस्तीत, फोडाफोडी करून गोव्यात, पूर्वोत्तर राज्यात, कर्नाटक, अशा विविध ठिकाणी सरकार बनवले आहे. जे फोडाफोडीचे प्रकार घडत आहेत, ती लोकशाहीसाठी चांगली बाब नाही.  लोकशाही पायदळी तुडवून गुलाम बनवण्याचे, हुकूमशाहीकडे नेण्याची ही प्रवृत्ती आहे, असेही त्यांनी सांगितले

COMMENTS