गांधी-नेहरुंचे विचार सोडून बाळासाहेब थोरात मातोश्रीचे उंबरठे झिजवतात – राधाकृष्ण विखे

गांधी-नेहरुंचे विचार सोडून बाळासाहेब थोरात मातोश्रीचे उंबरठे झिजवतात – राधाकृष्ण विखे

अहमदनगर – राज्य सरकार गोंधळलेलं असून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही, नवीन जीआर निघतो आहे. सरकारमधील मंत्री भांबावलेल्या अवस्थेत वक्तव्यं करत आहेत. महाराष्ट्रातील जनता, विद्यार्थी, पालक शिक्षक सगळेच संभ्रमात आहेत. सरकार टिकवण्यासाठी सत्तेचा सारीपाठ केला जातोय. वाटा मिळाला पाहिजे, घाटा नको यासाठीच अनेकांची धडपड सुरु आहे. राज्यातील जनता आणि शेतकऱ्यांची अवस्था काय झालीय ? त्यासाठी मात्र काहीही केलं जात नाही अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

दरम्यान काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरही त्यांना जोरदार टीका केली आहे. मी पक्ष सोडला म्हणूनच बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस पक्षात पद मिळालं, बाळासाहेब थोरात यांचं स्वतःचं कर्तुत्व काय असा प्रश्नही विखे-पाटील यांनी उपस्थित केला आहे. थोरात हे गांधी-नेहरुंचे विचार सोडून मातोश्रीचे उंबरठे झिजवत आहेत.

राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी पुढाकार घेतला असता, तर आनंद वाटला असता. मात्र केवळ सत्तेत वाटा मिळवण्यासाठी लाचारी केली जात आहे. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी बाळासाहेब थोरातांची धडपड सुरु असल्याचंही विखे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS