मुंबई – राधाकृष्ण विखे पाटील घेणार माहुल प्रकल्पग्रस्तांची भेट, जाणून घेणार समस्या ! 

मुंबई – राधाकृष्ण विखे पाटील घेणार माहुल प्रकल्पग्रस्तांची भेट, जाणून घेणार समस्या ! 

संजय पाटील

मंबई – विधानसभा विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील आज माहुल प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार आहेत. यासोबतच आमदार नसीम खान आणि काँग्रेसचे दक्षिण मध्य विभागाचे अध्यक्ष उपस्थित असणार आहेत. मुंबईत होणाऱ्या विकासकामांमुळे तानसा जलवाहिनी प्रकल्पग्रस्तांच माहुल येथे पुनर्वसन केलं गेलं. २०१५ ला राष्ट्रीय हरित लवादाने माहुल परिसर राहण्यायोग्य नसल्याच घोषित केलं होतं. तरी सुद्धा प्रकल्पग्रस्तांच माहुलला पुनर्वसन केलं गेलं. यामुळे माहुल प्रकल्पग्रस्तांनी या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने राज्य सरकाराला प्रकल्पग्रस्तांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश दिले होते. पण सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न  केल्याने प्रकल्पग्रस्त २८ ऑक्टोबरपासून विद्याविहार येथे आंदोलनाला बसले आहेत.

या आंदोलनाची दखल घेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार नसीम खान आणि काँग्रेसच्या दक्षिण मध्य विभागाचे प्रमुख अभिषेक मिस्त्री हे आज दुपारी ४ वाजता माहुल येथे भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार

COMMENTS