मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा करुया – विनोद घोसाळकर -video

मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा करुया – विनोद घोसाळकर -video

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग पाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव यावर निर्बंध आले आहेत. सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन सण आणि उत्सव अत्यंत साधेपणाने आजपर्यंत साजरे केले आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी साधेपणाने सण साजरे करुन मोठं योगदान दिलं आहे. त्याच प्रकारे आता गणपतीचा  उत्सव आपण साजरा करु असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोरोनाला हरवण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांच्या आवाहानाला प्रतिसाद देऊन गणेशोत्सव साधेपणाने साजरा करु असं मत शिवसेना नेते माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी केलं आहे. महापॉलिटिक्सची बोलताना काय म्हणाले विनोद घोसाळकर ते पाहूया…..

COMMENTS