पुण्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या पिचवर ‘विराट कोहली’ची राजकीय बॅटींग !

पुण्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या पिचवर ‘विराट कोहली’ची राजकीय बॅटींग !

पुणे – सध्या निवणुकांसाठी राजकीय पक्षांकडून विविध पद्धतीने प्रचार केला जात आहे. अनेक राजकीय नेते आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध सेलिब्रिटींना प्रचारासाठी आमंत्रित करतात. अशाच प्रकारे पुण्याती शिरुर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या उमेदवाराने विराट कोहलीला प्रचारसभेच्या पिचवर उतरवलं असल्याचं पहावयास मिळालं आहे.पुण्यातील शिरुर ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला रामलिंग ग्रामविकास पॅनलनं डुप्लिकेट विराट कोहलीला बोलावलं होतं. विशेष म्हणजे बॅनरवर ख-या विराट कोहलीचा फोटो छापला होता तर प्रचाराच्या पिचवर मात्र डिप्लिकेट विराट कोहली बॅटींग करताना दिसला आहे. ड्युप्लिकेट विराट कोहलीच्या रोड शोला नागरिकांनी, विशेषत: तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला असल्याचं पहावयास मिळालं आहे. या विराट कोहलीला पाहण्यासाठी, त्याच्याशी हात मिळवण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान रामलिंग ग्रामविकास पॅनलचे निवडणूक चिन्ह बॅट असल्यामुळे हातात बॅट घेऊन हा ड्युप्लिकेट विराट कोहली पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन करताना दिसला आहे. विशेष म्हणजे, रामलिंग ग्रामविकास पॅनलच्या पोस्टरवर प्रचार रॅलीचं मुख्य आकर्षण म्हणून खऱ्याखुऱ्या विराट कोहलीचं नाव आणि फोटो छापण्यात आला होता. त्यामुळे या ख-याखु-या विराटला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

 

COMMENTS