विश्वजीत कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष !

विश्वजीत कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष !

सांगली –  पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँगेसकडून त्यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली असून आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथीराज चव्हाण, सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार निरंजन डावखरे, खानापूर-आटपाडीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, कै. पतंगराव कदम यांच्या पत्नी विजयमाला कदम उपस्थित होते.

या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला पाठींबा दर्शवला आहे. ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे भाजपने उमेदवार न देता, ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी, अशी विनंती आम्ही करणार आहोत”, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे भाजप या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देणार का याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS