राज्यात कुठे, किती टक्के मतदान झालं?  वाचा सविस्तर!

राज्यात कुठे, किती टक्के मतदान झालं? वाचा सविस्तर!

मुंबई – राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रिक्रिया आज पार पडली. एकूण 10 जागांवर दुपारी पाच वाजेपर्यंत 57.22 टक्के मतदान झालं आहे. दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, मराठवाडय़ातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १० मतदारसंघांत मतदान पार पडलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराव अडसूळ, प्रीतम मुंडे यांच्यासह राज्यातील १७९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज पेटीमध्ये बंद झालं आहे.

कुठे किती टक्के मतदान?

बुलडाणा – 57 .8 टक्के, अकोला – 54.45 टक्के, अमरावती 55.43 टक्के, हिंगोली – 60.69 टक्के, नांदेड – 60.88 टक्के, परभणी – 58.50 टक्के, बीड – 58.44 टक्के, उस्मानाबाद – 57.04 टक्के, लातूर 57.94 टक्के, सोलापूर – 51.98 टक्के

COMMENTS