गली गली मे शोर है, मोदी सरकार चोर है, तरुणाची मंत्रालयात घोषणाबाजी !

गली गली मे शोर है, मोदी सरकार चोर है, तरुणाची मंत्रालयात घोषणाबाजी !

मुंबई – मंत्रालयात आज एका युवकाने मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली असल्याचं समोर आलं आहे. सागर गुरुले असं या तरुणाचं नाव असून गली गली मे शोर है, मोदी सरकार चोर है,  अशी जोरदार घोषणाबाजी या तरुणानं दिली आहे. तो शिक्षणविभागात कामासाठी आला होता परंतु काम न झाल्यामुळे संतप्त होऊन त्याने ही घोषणाबाजी केली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान सागर महादेव गुरुले या तरुणाला मंत्रालयातील पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. दरम्यान या तरुणानं आज पंतप्रधान मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे काही काळ मंत्रालयातील वातावरण तापलं असल्याचं पहावयास मिळालं आहे.

COMMENTS