मुंबई – अंगणवाडी सेविकांनी अखेर आज संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंगणवाडी कृती समितीबरोबर घेतलेल्या बैठकीत सेवा ज्येष्ठतेप्रमाणे मानधन वाढवून देण्याचे आश्वासन दिले. या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
अंगणवाडी सेविकांना आता सेवा ज्येष्ठतेप्रमाणे मानधन वाढवून मिळणार आहे1 ऑक्टोबरपासून मानधन वाढ लागू केली जाणार आहे. सध्याच्या मानधनावर 5 टक्के मानधन वाढ दिली जाणार आहे. या बैठकीतील माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
अंगणवाडी सेविकांना 10 वर्षे सेवा झाल्यास 6500 मानधन मिळणार आहे. तर 10 ते 20 वर्षे सेवा केल्यास 6695 मानधन मिळेल. 20 ते 30वर्षे सेवा झाल्यास 6760 इतके तर 30वर्षांहून अधिक वर्षे सेवा झाल्यास 6825 रुपये मानधन मिळणार आहे.
COMMENTS