अकोल्यात नाफेडकडून तूर खरेदीला सुरुवात

अकोल्यात नाफेडकडून तूर खरेदीला सुरुवात

अकोल्यात अखेर  आज  नाफेडकडून तूर खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र अजून बाकी ठिकाणी तूर खरेदी केंद्रावरून पडून आहे. गेल्या 5 दिवसांपासून महाराष्ट्रातला शेतकरी काबाड-कष्टानं पिकवलेली तूर घेऊन रस्त्यावर आहे. त्याचा आक्रोश मात्र सरकारपर्यंत पोहोचताना दिसत नाहीय. विरोधक सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्र दौरा करतायत. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय घ्यावा लागेल. तसं नाही झालं तर शेतकऱ्यांच्या असंतोषाचा स्फोट कधीही होऊ शकतो.

दरम्यान, 22 तारखेपर्यंत नाफेड केंद्रावर नोंदणी केलेल्या तूरीचीच खरेदी होणार आहे. त्यामुळे नोंदणी न केलेल्या पण खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभा असलेल्या तूर उत्पादकांचं काय हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.

 

 

COMMENTS