रत्नागिरी – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून जोरदारपणे सुरू आहे. काँग्रेसमध्ये नाराज असल्यामुळे राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशा अनेक दिवसांपासूमन माध्यमांमध्ये हेडलाईन होत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेत राणे सहभागी झाले नव्हते. उलट संघर्ष यात्रेचा काहीच प्रभाव पडला नसल्याची टीका त्यांनी केली होती. त्यामुळेच ते भाजपच्या गोटात केव्हांही सामिल होऊ शकतात अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कारण राणे यांनी अखेर विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेत सहभाग घेतला. सावर्डे येथील सभेत नारायण राणे उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका करुन काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलेले माजी खासदार नीलेश राणे यांनीही संघर्ष यात्रेत सहभाग नोंदवला.
COMMENTS