अखेर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल; पंजाब, उत्तराखंडला नवे प्रदेशाध्यक्ष

अखेर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल; पंजाब, उत्तराखंडला नवे प्रदेशाध्यक्ष

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक आणि दिल्ली महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर अखेर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत.  पंजाब आणि उत्तराखंडमध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्यात आले असून राजस्थानमध्येही नवीन प्रभारी नेमण्यात आला आहे. याबाबतची घोषणा आज (गुरुवारी) काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केली.

उत्तराखंडध्ये प्रितम सिंह यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर पंजाबमध्ये सुनील जाखर यांना संधी दिली आहे. तर अविनाश पांडे यांची राजस्थानमध्ये सरचिटणीस म्हणून निवड केली आहे. याशिवाय राज्यसभेतील खासदार विवेक तंखा यांची पक्षाच्या लीगल सेलच्या प्रमुखपदी निवड केली आहे. तसेच  पक्षसंघटनेतील 17 नवीन पदाधिकाऱ्यांपैकी 10 पदाधिकारी हे 50 वर्षांखालील आहेत, असे सुरजेवाला यांनी सांगितले.

COMMENTS