अखेर दानवेंनी अडीच लाखाचे थकित वीजबिल भरले

अखेर दानवेंनी अडीच लाखाचे थकित वीजबिल भरले

जालना –  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी आपले अडीच लाखांचे थकित वीजबिल भरले आहे. जालन्याच्या भोकरदनमधील दानवेंच्या राहत्या घराचे 2 लाख 59 हजार 176 रुपयांचे वीजबिल थकित होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची महावितरणाचे तब्बल अडीच लाखांचे वीजबील थकलेले होते. दानवेंचे भोकरदनमधील घराचे गेल्या 83 महिन्यांपासूनचे वीजबिल थकलेले होते. आश्चर्याची बाब म्हणजे महावितरणनेही दानवेंवर कोणतीही कारवाई केलेली नव्हती. महावितरणने जारी केलेल्या जुलैच्या वीजबिलावर तसा स्पष्ट उल्लेखही करण्यात आला होता. फक्त जुलै महिन्यातच दानवेंकडे 29 हजार 595 हजारांची थकबाकी होती.

 

COMMENTS