अखेर राधेश्याम मोपलवार पदावरून दूर, मुख्यमंत्र्यांचे आदेश

अखेर राधेश्याम मोपलवार पदावरून दूर, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई – समृद्धी महामार्गाचे प्रमुख राधेश्याम मोपलवार चौकशी होईपर्यंत त्यांना पदावरून दूर राहणार असल्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले आहेत.

समुद्ध महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख राधेश्याम मेपलवार यांची काही दिवसांपूर्वी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या आडिओमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरू होते. त्यानंतर याप्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोपलवार यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती फेटाळून लावली होती.

आज विरोधकांनी मोपलवारांचे तातडीने निलंबन करण्याची मागणी करत विधानसभेत  गोंधळ घातला होता. आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोपलवारांना चौकशी होईपर्यंत पदावरून दूर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

COMMENTS