अजित दादांच्या हस-या फोटोंचे टपाल ‘राज’गडावर !

अजित दादांच्या हस-या फोटोंचे टपाल ‘राज’गडावर !

मुंबई –  काही  दिवसा पुर्वीच अजित पवार हे सतत गंभीर असतात, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यावर आता राष्ट्रवादी युवती काँग्रेसने सडकून टीका केली आहे. अजित पवार हे सतत गंभीर असतात, पण तुम्हाला गंभीर वाटणाऱ्या आमच्या अजितदादांना लोकांची अधिक काळजी असते. अनेक प्रसंगात अजितदादा मनमुराद हसतात, याचा आपणाला अनुभव नसेल, असे सांगत अजितदादा हे दिलखुलास हसत असलेल्या 25 फोटोंचा अल्बम राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा अदिती नलावडे यांनी कुरिअरद्वारे राज ठाकरे यांना पाठवला आहे.

‘राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या लोकप्रियतेची आपणास माहिती नसेल, लोकांनी प्रचंड मताधिक्याने अजित पवार यांना निवडून दिलेले आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीला निवडून देताना लोकांच्या अपेक्षा असतात. अशावेळी नेहमी चेष्टा, मस्करी, विनोद, नकला अपे‌क्षित नसतात. अजित दादा सत्तेत असतानाही आणि आता विरोधी पक्षात असताना आजही लोकांना सकाळी सात वाजता भेटतात. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन शक्य तितकी मदत करतात.  अजितदादा लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधतात. हेच लोकांना अपेक्षित असते’. असे राष्ट्रवादी युवतीच्या नेत्या अदिती नलावडे यांनी राज ठाकरे यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

COMMENTS