बारामती – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांची बदनामी करणारी पोस्ट फेसबुकवर टाकल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती शहर पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदनामीकारक पोस्ट टाकणारा व्यक्ती हा बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाअध्यक्ष राहुल बावळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावरुन भादविं कलम 294 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्ट टाकणा-या आरोपीला तात्काळ अटक करावी अन्यथा राष्ट्रवादीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बावळे यांनी दिला आहे.
COMMENTS