पुणे – अजित पवार यांनी जलसंपदा विभागात कोणाताही घोटाळा केला नसल्याचं सांगत त्यांच्यावर होणारे आरोप हे खोटे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. ते पुण्यात बोलत होते. 72 हजार कोटी रुपायांचा घोटाळा झाला अशा बातम्या माध्यमातून चालवल्या जात आहेत, मात्र एवढा पैसाच आजपर्य़ंत खर्च झाला नाही असंही पवार म्हणाले. काही वर्षांपूर्वी माझ्यावरही दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यावेळीही ट्रकभर पुरावे देऊ असं सांगितलं गेलं होतं. प्रत्यक्षात त्यात काहीही निघालं नाही. पण जेंव्हा आरोप झाले तेंव्हा मीडियामध्ये त्याच्याविषयी खूप मोठ्या प्रमाणात छापून आलं होतं. तसाच प्रकार अजित पवार यांच्याबाबतत घडत असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं. ईडीच्या कारवाईच्या बातम्यांबाबत पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं.
COMMENTS