अडवाणींसह भाजपच्या 13 नेत्यांवर बाबरी मशीद प्रकरणी केस चालणार

अडवाणींसह भाजपच्या 13 नेत्यांवर बाबरी मशीद प्रकरणी केस चालणार

दिल्ली – सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने भाजपच्या नेत्यांना जोरदार फटका बसला आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह 13 नेत्यांवर बाबरी मशीद प्रकरणी केस चालणार आहे. या नेत्यांमध्ये अडवाणी यांच्याशिवाय उमा भारती, मुरलीमनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश आहे. कल्याणसिंह यांना मात्र यातून वगळण्यात आलं आहे. ते सध्या राज्यपाल असल्यामुळे त्यांना वगळण्यात आलंय. मात्र राज्यपाल पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. या नेत्यांनी बाबरी मशीद पाडण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या नेत्यांना खटल्यातून वगळण्याला सीबीआयनं आक्षेप घेतला होता. त्यावर सुप्रीम कोर्टाने सीबीआयचं म्हणण मान्य करत 13 नेत्यांवर खटला चालवण्यास परवानगी दिली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दिवंगत झाल्यामुळे त्यांच्याविरोधातही केस चालणार नाही. या प्रकरणाची  दोन वर्षात सुनावणी पूर्ण करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.  लखनौ आणि रायबरेली येथील केसेस एकत्र चालवाव्यात असंही कोर्टाने सांगितले आहे.  लखनौ कोर्टात डे टू डे सुनावणी होणार आहे.

COMMENTS