दिल्लीत अण्णा हजारे आज आंदोलनाची घोषणा करणार आहेत. लोकपाल आणि स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने अण्णा हजारे आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.
लोकपाल व शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरणार्या स्वामीनाथन आयोगाची शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणी गेल्या तीन वर्षापासून अण्णा हजारे करीत आहेत, मात्र याकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. याकडे सरकारने गांभीर्याने पहावे व शेतकर्यांच्या होणार्या नुकसानही टाळण्यात यावी यासाठी हे आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राजघाटावर महात्मा गांधी यांच्या प्रेरणास्थळावर जाऊन दर्शन घेऊन ते आंदोलनाची घोषणा करणार आहे.
COMMENTS