लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्ती, भ्रष्टाचार रोखण्यास कडक कायदा तसेच शेतकऱयांच्या समस्यांचे निराकरण न केल्याने अशा विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत अण्णा हजारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून इशारा दिला आहे.
जनआंदोलन केल्याने मागील सरकारने भ्रष्टाचारविरोधात कडक पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नव्या सरकारने तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला तरीदेखील समाधानकारक पावले उचलली नाहीत. त्यामुळे अण्णांनी एका पत्राद्वारे जनआंदोलन सुरु करण्याचा इशारा दिला असल्याची माहिती मिळत आहे.
Anna Hazare writes to PM saying he would continue campaign in Delhi till Lokayukta isn't appointed & Swaminathan Report isn't implemented
— ANI (@ANI) August 30, 2017
COMMENTS