मुंबईला गेल्या दोन दिवसात पावसाने चांगलाच झोपून काढला आहे. मंगळवारी अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे सेवापुर्ण पणे कोलमडली होती. यामुळे शेकडो प्रवासी अनेक गाड्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास अडकले होते. तास-न्-तास अडकून राहण्यापेक्षा काहींनी रेल्वे मार्गावरुनच घर आणि कामावर जाणे पसंत केले. यावर पावसामुळे कोलमडलेल्या मुंबईवरून आता राजकीय आरोपांना सुरुवात झाली आहे.
मनसेचे पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला टार्गेट केली आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विटवरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. “35 हजार कोटींच्या महानगरपालिकेला आंतरराष्ट्रीय दर्जाची ड्रेनेज व्यवस्था उभारता आली नाही आणि म्हणे ‘ करून दाखवलं !!!” असं ट्विट करुन सेनेला चांगलाच टोमना मारला आहे.
३५ हजार कोटीच्या महानगरपालिकेला आंतरराष्ट्रीय दर्जाची ड्रेनेज व्यवस्था उभारता आली नाही आणि म्हणे……
'करून दाखवलं'…!!— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 30, 2017
COMMENTS