40 लाख शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार, ते आम्हाला सभागृहात पाहिजे – उद्धव ठाकरे

40 लाख शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार, ते आम्हाला सभागृहात पाहिजे – उद्धव ठाकरे

मुंबई  –  ‘कर्जमुक्‍ती सत्‍य आकडेवारीवर आधारित असावी. आधी महाराष्‍ट्राची लोकसंख्‍या पाहा आणि मगच शेतकरी कर्जमाफी करा. नाही तर मर्यादेपेक्षा अधिक कर्जमाफी होण्‍याची शक्‍यता आहे. कर्जमाफी झालेल्‍या  शेतकर्‍यांची नावे आणि पत्ते यांची माहिती आणि 40 लाख शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार, ती माहिती  सरकारने विधानसभेत द्यावीत. सरकारने जाहीर केलेले आकडे पटवून द्यावेत तरच सरकारबद्‍दल विश्‍वास दृढ होईल.’ असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्‍धव ठाकरे म्हणाले.  आज, शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्‍यात कर्जमुक्‍तीचे वातावरण घोंघावत आहे. शेतकर्‍यांचे सरसकट कर्ज माफ करण्‍याचे आश्‍वासन देण्‍यात आले. मात्र, शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठीचे अर्ज भरण्‍याचे २६ हजारपैकी १३ हजार केंद्रे बंद आहेत. शेतकरी जाणार कुठे? असा प्रश्न  ठाकरे यांनी उपस्‍थित केला.

सीमेवर सध्‍यपरिस्‍थितीत तणावाचे वतावरण आहे. चीन आणि भारताच्‍या दरम्‍यान डोकलामवरुन वाद चिघळत आहे. संरक्षण खात्‍याबाबत सरकार गंभीर नाही, असा घणाघणाती  उद्‍धव ठाकरे यांनी केला.  या वेळी उद्‍धव ठाकरे यांनी शिवसेनेच्‍या बैठकीत झालेल्‍या चर्चेचाही संदर्भ शिवसेनेचे नेते आपली जबाबदारी पार पाडतील. आम्‍ही दुपटीने खासदार, आमदार आणू. सेनेने महाराष्‍ट्राच्‍या जबाबदार्‍या मंत्र्यांवर टाकल्‍या. उत्तर महाराष्‍ट्राची जबाबदारी संजय राऊतांकडे राहील. विदर्भ, पुणे दिवाकर रावते, कोल्‍हापूर, सांगली, सातारा गजानन किर्तीकर, नगर, मराठवाडा, सोलापूर रामदास कदम यांच्‍याकडे राहील, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

 

 

 

COMMENTS