पुणे – ‘ कोपर्डी घटनेचा निकाल 1 जानेवारीपर्यंत न लागल्यास मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही.’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
‘कोपर्डी घटनेला दीड वर्ष होत आला मात्र अद्यापही या खटल्याचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे आता आणखी उशीर झाला तर आम्ही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही. या प्रकरणाचा निकाल 1 वर्षाच्या आत लावला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र, आतापर्यंत तरी याचा निकाल लागलेला नाही.’ असं वक्तव्य करत हा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
COMMENTS