कामावर रुजू व्हा अन्यथा सहा महिन्यांचा पगार कापणार असल्याचा इशारा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिला. डॉक्टरांनी आज रात्री 8 वाजेपर्यंत कामावरु रुजू व्हावे, अन्यथा ही कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
राज्यातील नाशिक, धुळे आणि मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनांनंतर राज्यभरातील तब्बल 4500 निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेच्या नावाखाली काम बंद आंदोलन पुकारले. हे निवासी डॉक्टर गेल्या दोन दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. या मुद्यावरुन उच्च न्यायालयाने सामूहिक रजेवर गेलेल्या निवासी डॉक्टरांना नुकतेच फटकारले.
मात्र, अद्यापही निवासी डॉक्टर माघार घेण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे वसतिगृहातील खोल्या खाली करा, असा अल्टिमेटम राज्य सरकारने संपकरी डॉक्टरांना दिला. त्यानंतर आता सरकारने आज रात्री 8 पर्यंत कामावर हजर राहा, अन्यथा सहा महिन्यांचा पगार कापण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
COMMENTS