अन् झेड सेक्यूरीटीत दूध मुंबईला रवाना

अन् झेड सेक्यूरीटीत दूध मुंबईला रवाना

देशभरात विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी संप पुकारला आज आक्रमक पवित्रा घेत ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या उद्रेकामुळे कोल्हापूरवरुन मुंबईला जाणारे दूध आज पुणे -मुंबई द्रुतगतीमार्गावर चक्क झेड सेक्युरेटीमध्ये रवाना झाले. त्यामुळे उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या होत्या. कारण केवळ व्हिआयपी लोकांना दिली जाणारी सेक्युरीटी शेतकरी संपामुळे दूध व भाज्यांना द्यावी लागत आहे.

यामध्ये कोल्हापूर व सांगली परिसरातील गोकुळ व वारणा दुधाचे 27 टँकर 5 पोलीस गाड्या व इतर पोलिसांच्या ताफ्यात मुंबईकडे रवाना झाले. शेतकरी व इतर संघटनाद्वारे दुध रस्त्यावर ओतले जाऊ नये यासाठी हा पोलिसांचा ताफा गाड्यांसोबत देण्यात आला आहे.

COMMENTS