अबब… ग्राहकाला तब्बल 38 अब्ज रुपयांचे वीजबिल !

अबब… ग्राहकाला तब्बल 38 अब्ज रुपयांचे वीजबिल !

झारखंडमध्ये एका व्यक्तीला चक्क 38 अरब रुपयांचे वीजबिल आले आहे. बी. आर. गुहा असे या व्यक्तीचे नाव आहे. बील भरले नाही म्हणून वीजवितरण विभागाने गुहांच्या घराची वीज कापली आहे. वीजवितरण विभागाच्या या प्रकारामुळे ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या गुहा यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

तीन खोल्यांचे घर, घरात फक्त तीन फंखे, तीन ट्यूब लाइट आणि एक टीव्ही त्यामुळे एवढे बील कसे काय ? असा सवाल बी. आर. गुहा यांनी उपस्थित केला आहे. गुहा यांच्या मुलीने  याप्रकरणी वीजवितरण विभागाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. वीजवितरणाच्या भोंगळ कारभारामुळे गुहा कुटुंबियांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वीजवितरण विभागाचा असा भोंगळ कारभार यापूर्वीही अनेकदा समोर आला आहे.

COMMENTS