बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला मुंबई महापालिकेने बेकायदेशीर इलेक्ट्रिक बोर्डाप्रकरणी नोटीस बजावली असून सध्या ती फारच अडचणीत आली आहे. शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर अनुष्का शर्माला ही नोटीस बजावण्यात आली. ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या बातमी नुसार तिच्या वर्सोवा येथील घरात तिने बेकायशीरपणे इलेक्ट्रिक मीटर लावले असल्याचे शेजा-यांचे म्हणणे आहे.
अनुष्का वर्सोवामधील बद्रिनाथ टॉवरच्या 20 मजल्यावर राहते. संपूर्ण मजलाच शर्मा कुटुंबीयांच्या नावावर आहे. या इमारतीचे माजी सचिव सुनील बत्रा यांच्या माहितीनुसार अनुष्का शर्माने मजल्याच्या पॅसेजमध्ये बेकायदेशीररित्या इलेक्ट्रिक बॉक्स लावला असून शर्मा कुटुंबीयांने इमारतीच्या अन्य नियमांचेही उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. बत्रा यांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या क प्रभागातील सहाय्यक अभियंत्यांनी सहा एप्रिलरोजी अनुष्का शर्माला नोटीस बजावली आहे.
मात्र अनुष्का शर्माच्या प्रसिद्धीप्रमुखांनी माध्यमांशी बोलताना हे आरोप फेटाळले आहेत. शर्मा कुटुंबियांनी रीतसर परवानगी घेऊनच इलेक्ट्रिक बॉक्स लावले अस्ल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बत्रा यांच्या मालकीचा इमारतीतील 16 वा आणि 17 वा मजला आहे. त्यांनी सर्वप्रथम अग्निशमन दलाकडे तक्रार केली. मात्र त्यांना महापालिकेकडे तक्रार करण्यास सांगितले. बत्रा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली. अनुष्का शर्माच्या घराबाहेरील बेकायदेशीर इलेक्ट्रीक बॉक्स हा धोकादायक असून तो तात्काळ हटवावा असे निर्देश महापालिकेने शर्मा कुटुंबीयांना दिल्याचे बत्रा यांनी म्हटले आहे. बत्रा यांनी नोटीशीची प्रतच जाहीर केली आहे.
COMMENTS