राजकारणात कुणीच कुणाचा कायम शत्रू अथवा मित्र नसतो याचा प्रत्यय अमरावती जिल्हा परिषदेच्या नव्या राजकीय समीकर्णावरून दिसून आला आहे सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस-एनसीपी-शिवसेना आणि अपक्षानी मैत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या मैत्री ने भाजपला सत्ते पासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदांसाठीच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य असलेल्या काँग्रेस पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ शिवसेना व दोन अपक्ष सदस्यांनी या युतीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस सोबत एनसीपी-सेना पक्ष संयुक्त निवडणूक लढवणार आहेत अध्यक्ष पद काँग्रेसकडे तर उपाध्यक्ष पद शिवसेनेकडे राहणार आहे या शिवाय चार विषय समिती सभापती, जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद स्थायी समितीचे सदस्य पदाकरिता काँग्रेसला शिवसेना आणि अपक्ष यांचे बिनशर्त समर्थन देण्यावर एकमत झाले आहे
अमरावती जिल्हा परिषद पक्षीय बलाबल
काँग्रेस- 26
रिपाई -1
राष्ट्रवादी -5
प्रहार – 5
भाजप -13
सेना -3
बसपा -1
युवा स्वाभिमान -2
स्वाभिमानी शेतकरी संघटना – 1
अपक्ष -2
एकूण – 59
COMMENTS