मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यात मातोश्रीवर बैठक सरू आहे. मातोश्रीवर जाताना शाह आणि मुख्यमंत्री यांच्यासमवेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही त्यांच्यासोबत होते. मात्र शाह, मख्यमंत्री आणि उद्धव यांच्या बैठकीत दानवे यांना मात्र प्रवेश दिला गेला नाही. त्यांना बाहेर बसवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मातोश्रीच्या वरच्या मजल्यावर बैठक सुरू आहे. दानवेंना मात्र बैठकीत प्रवेश का नाकारला याबद्दल विविध चर्चा राजकीय वर्तुळात रंगवल्या जात आहेत. दानवेंनी शेतक-यांबद्दल केलेल्या वक्तव्यामळे त्यांन बैठकीत प्रवेश बंदी केल्याचं बोलंल जातंय. मात्र दानवेंना प्रदेशाध्यक्ष असूनही पक्षात फारसं महत्व दिलं जात नसल्याची चर्चा आहे. महापालिका निवढणुकीत दानवेंना कुठेही फारसं स्थान नंव्हतं. त्यामुळे मंबई महापालिका निवडणुकीनंतर झालेल्या पक्षाच्या विजय मेळाव्याला दानवे मुंबईत असूनही उपस्थित राहिले नव्हते.
COMMENTS