तामिळनाडूच्या राजकारणात दोन्ही द्रविड पक्षांकडून निवडणूक प्रचारात मोफत देण्याच्या मोठ मोठ्या घोषणा होतात. आणि त्यावरच निवडणूक प्रचाराचा मुख्य भर असतो. मग मोफत टीव्ही असेल, किंवा मोफत जेवण असेल, किंवा मोफत अन्य काही…. त्यामध्ये स्वर्गीय जयललीता यांनी सुरू केलेले अम्मा कॅन्टीन तुफान लोकप्रिय झाले होते. त्याचीच री आता उत्तर प्रदेशात ओढली जाणार आहे.
अम्मा कॅन्टीनसारखी योजना उत्तर प्रदेश सरकार सुरू करणार आहे. अम्मा कॅन्टीन ऐवजी त्याचं नाव प्रभू की रसोई असं ठेवण्यात आलं आहे. गोरगरीबांना एक वेळचं तरी मोफत जेवण मिळावं अशी या मागची संकल्पना आहे. सहारणपूरमध्ये येत्या 9 ऑगस्टला अशा प्रकारचे प्रभू की रसोई सुरू करण्यात येणार आहे. पहिल्यांदा तिथे 300 जणांनी मोफत जेवण्याची सोय करण्यात येणार आहे. तामिळनाडूमध्ये मोफत योजना खूप लोकप्रिय झाल्या होत्या. आता उत्तर प्रदेशात त्याला कसा प्रतिसाद मिळतो आणि त्याचं मतांमध्ये कितपत रुपांतर होतं हे येणारा काळच ठऱवेल.
COMMENTS