अमरावती – राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनंटीवार आज आमरावती जिल्ह्याच्या दौ-यावर होते. त्यावेळी त्यांना शेतक-यांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. आढावा बैठकीसाठी मुनंगटीवर जिल्ह्यात येत असताना शेतकरी आंदोलक आणि काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. तर त्यापैकी काहींनी मुनगंटीवार यांच्या गाडीवर कांदा आणि दूध फेकले. तर आंदोलकांपैकी एकाने मुनगंटीवार यांच्या गाडीवर उडी घेण्याचा प्रय़त्न केला. त्याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलकांच्या या पवित्र्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच झटापट झाली. यावेळी भाजप कार्यकर्तेही मुनगंटीवार यांच्या बाजुने रस्त्यावर उतरले. त्यामुळे काही काळ तिथे तणावाचा वातावरण निर्माण झालं होतं. आंदोलक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांसमोर आले होते.
COMMENTS