नेहमीच कोणत्या न कोणत्या वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असणारी कल्याण – डोंबिवली महापालिका आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एकीकडे कल्याण डोंबिवलीच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरु असताना दुसरीकडे बसपाची नगरसेविका मात्र मोबाईलवर गेम खेळण्यात दंग असल्याचे दिसून आले. या प्रकारावर सर्वच स्तरातून टिका होत आहे.
बहुजन समाज पक्षाच्या नगरसेविका सोनी आहिरे या 27 गावांतून निवडून आल्या आहेत. गेल्या आठवड्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पावर आज चर्चेसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावर सर्वच लोकप्रतिनिधींकडून जोरदार चर्चा झडत असताना त्यादरम्यान अहिरे या तब्बल तासभर मोबाईलवर ‘सबवे सर्फर’ हा गेम खेळताना दिसून आल्या. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता एवढ्या क्षुल्लक कारणासाठी आपल्याला प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्याचे सोनी अहिरे यांनी सांगितले.
COMMENTS